
बी.जे.एस. महाविद्यालयात नागपंचमीनिमित्त ‘सर्प जनजागृती’ कार्यशाळा उत्साहात संपन्न!
वाघोली (ता.हवेली): नागपंचमीच्या पवित्र आणि पारंपरिक दिवशी, अंधश्रद्धांना छेद देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने ‘सापांविषयी जनजागृती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, IQAC समन्वयक आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. माधुरी देशमुख, तसेच वनस्पतिशास्त्र…