
लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन…