
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत टाळावी – ॲड. प्रिया कोठारी
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेमध्ये नुकताच विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध ॲड. प्रिया कोठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत यांसारख्या आजच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थी व पालकांना मोलाचा सल्ला दिला. ॲड. प्रिया कोठारी यांनी…