
शिक्रापूरच्या भैरवनाथ वाचनालयाचा सुवर्णमहोत्सव, सरपंच आणि सदस्यांचा अनोखा उपक्रम!
शिक्रापूर (ता. शिरूर): शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय यंदा पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावचे आदर्श सरपंच रमेश गडदे आणि ग्रामपंचायत सदस्य शालन राऊत, उद्योजक प्रीतम राऊत व इतर सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांनी स्वखर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सदस्यत्व दिले आहे, ज्यामुळे वाचनसंस्कृतीला चालना…