शिक्रापूर: मलठणफाटा-गणेगाव रस्ता खड्ड्यात; दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) येथील मलठण फाटा ते गणेगाव खालसा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या रस्त्याची तातडीने डांबरमिश्रित खडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी केली आहे. मलठण फाटा हा परिसर व्यापारीदृष्ट्या अत्यंत गजबजलेला चौक आहे. येथून बुरुंजवाडी, गणेगाव खालसा, वाघाळे आणि मलठण या…
