
पुण्यात दरोडेखोरांचा पोलीस उपायुक्तांच्या छातीवर व फौजदाराच्या हातावर कोयत्याने वार; प्रत्युत्तरादाखल पोलिसांचा गोळीबार
पुणे – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड हे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ही थरारक घटना घडली…