
पुणे येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ३३१ पदकविजेत्यांचा गौरव
मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ दि. २८ ऑगस्ट पुणे– राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, पुणे येथे ३३१ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडेल. या कार्यक्रमात, ‘मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर’ या महत्त्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ…