Swarajyatimesnews

आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा ज्येष्ठ नागरिकांना ‘काठीचा आधार’

 शिक्रापूरमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन  शिक्रापूर (ता.शिरूर) भूमीतून सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय आज लिहिला गेला. शिक्रापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत, आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हृदयस्पर्शी पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी आधार मिळावा म्हणून काठी वाटप करण्यात आले. हा केवळ एक वस्तू वाटपाचा कार्यक्रम नव्हता, तर ज्येष्ठांच्या आयुष्यात ‘आधार’ बनून त्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देणारा एक…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!

दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीतील वसेवाडी शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम

२९ विद्यार्थी चमकले सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकास अटक

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे काल रात्री, ९ जुलै २०२५ रोजी, किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम गोरक्षनाथ कांदळकर (वय १८) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिवम काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा – पेरणे बंधारा की वॉल गेली वाहून, नंतर पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले धावून

शेतकऱ्यांचे डोळे पाणावले, पण अधिकाऱ्यांचे डोळे पाहणीतच रमले, पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह ??? कोरेगाव भीमा (ता. शिरूर) आणि पेरणे (ता.हवेली) येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाच्या पाण्याच्या  प्रवाहात ढापे न काढल्याने व वेळेत योग्य ती दुरुस्ती न झाल्याने फुटून गेला. सदर बंधारा फुटल्याने अधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा सकाळी सकाळी भेट देत पाहणीची कार्यतत्परता दाखवली…

Read More
Swarajyatimesnews

”पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार’! कोरेगाव भिमा – पेरणे येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटला

कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने १७८३ हेक्टर शेतजमीन,अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तर ग्रामस्थांकडून तातडीने नवीन बंधारा बांधण्याची मागणी दिनांक २० जून २०२५  कोरेगाव भीमा (ता. शिरूर): शिरूर आणि हवेली तालुक्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या भीमा नदीवरील, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) आणि पेरणे (ता. हवेली) दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा महत्त्वाचा बंधारा अखेर फुटला आहे!…

Read More
Swarajyatimesnews

नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य

 कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्याकडून नरेश्वर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन ‘बॅग,वह्या,’ वाटप तर शासनाची पुस्तके व गणवेश वाटप उत्साहात साजरा कोरेगाव भीमा (ता. शिरूर): “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!”…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत

“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला….

Read More
Swarajtatimesnews

सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म शिरुर तालुक्यातील शिक्रापूरजवळील मलठण फाटा परिसरात सर्पमित्राच्या गाडीतच एक अतिविषारी घोणस जातीचा साप मादी असल्याचे लक्षात येताच मोठा आश्चर्यकारक प्रकार समोर आला. या सापाने थेट कारमध्ये ठेवलेल्या बरणीतच तब्बल २७ पिल्लांना जन्म दिला असून, या दुर्मीळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाच्या सरी सुरू असताना…

Read More
error: Content is protected !!