पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय नामदेव काळे यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(A case has been registered against Dattatray Namdev Kale, Sub-Inspector of Hinjewadi Police Station under Chinchwad Police Commissionerate, for demanding a bribe.)
तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात जामीन अर्जावर पोलिसांचे म्हणणे न्यायालयात सादर करण्यासाठी उपनिरीक्षक काळे यांनी तक्रारदाराकडे ६०,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १५ एप्रिल २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे करण्यात आली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. १५मे २०२५ रोजी लोकसेवक दत्तात्रय काळे यांचेकडे पंचासमक्ष पडताळणी केळी असता, त्यांनी तक्रारदाराकडे वरील कामासाठी सुरवातीस ६०,००० रुपयाची लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ३०,००० रुपयाची लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याने, लोकसेवक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक यांचेविरुद्ध सदर प्रकरणी १४ मे २०२५ रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (प्रशासन) सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उप-अधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक लाचलुचपत विभाग प्रेम वाघमोरे यांनी केली.(Pune Police Bribe case)