दुचाकीस्वारासह सहप्रवाशालासुद्धा हेल्मेट सक्ती, अन्यथा दोघांनाही दंड, वाहतूक विभागाचे आदेश

Swarajyatimesnews

विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.(The number of accidents involving two-wheeler riders and their passengers without helmets, resulting in fatalities and injuries, is increasing at a large scale. Therefore, the Additional Director General of Police, Traffic Department, has ordered all the Police Commissioners and Superintendents of Police in the state to take action against two-wheeler riders and their passengers without helmets.)

त्यामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती.

आता मात्र सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे. केवळ सहप्रवाशावर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे.

सध्या विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत देखील कारवाई केली जात आहे. पुणे शहरात दररोज अशा प्रकारे सुमारे चार हजार चालकांवर कारवाई केली जाते. मात्र त्यातून दंड भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे दंडाचे प्रकरण ‘लोकअदालती’मध्ये ठेवण्यात येणार असल्याचे वाहन चालकांना कळविले जाते. तेव्हा बहुतेक वाहनचालक दंड भरतात.

पत्रात काय नमूद आहे – राज्यातील गेल्या पाच वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून आले आहे की, विना हेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून दंड आकारण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!