पुण्यातील हडपसर परिसरात १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना दोघांनी अचानक घरात शिरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांनी तिचे तोंड, डोळे रुमालाने बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या हाताला चिकटपट्टी बांधून तिला खाली पाडून तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सदर मुलगी ही तिच्या राहत्या घरी असताना, तिचे पालक हे कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती घरात जबरदस्तीने शिरल्या. त्यांनी मुलीला धमकावून बांधून ठेवले व तिच्या तोंडावर रुमाल बांधला.त्यानंतर आरोपी तिला म्हणाले, तुझ्या बापाने माझा अपमान केला आहे, त्याला जास्त माज आहे, आमच्या मागून तो पुढे गेला आहे, तुझे लग्न कसे होते ते मी बघतोच, अशी धमकी देऊन शिवीगाळ करू लागले. त्यानंतर त्यांनी मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत तिच्या शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिने प्रतिकार केला असता दोघे जण पळून गेले. याप्रकरणी हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.