डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कु. ओंकार चंद्रकांत बांगर याची जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी ही माहिती दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओंकारने चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्गशिक्षिका अनुराधा विजय बेंडभर यांनी ओंकारच्या या यशाचे कौतुक करत त्याने यशाची गुढी उभारली असल्याबाबत मत व्यक्त केले.
ओंकारने आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षिका अनुराधा बेंडभर, मुख्याध्यापक, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि आपल्या पालकांना दिले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास गव्हाणे, शिक्षणतज्ज्ञ विशाल गव्हाणे, उपाध्यक्ष पायल गव्हाणे, दिपाली गव्हाणे आणि इतर सदस्यांनी शाळेत येऊन ओंकार आणि अनुराधा बेंडभर यांचा सत्कार केला.
डिंग्रजवाडी गावाचे सरपंच यशवंत गव्हाणे, उपसरपंच गव्हाणे, विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य प्रवीण गव्हाणे, उद्योजक मच्छिंद्र गव्हाणे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनीही ओंकार आणि अनुराधा बेंडभर यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कोरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख काळुराम पिंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, राजेंद्र टिळेकर आणि शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनीही ओंकार आणि अनुराधा बेंडभर यांच्या यशाचे कौतुक केले.
कोरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख काळुराम पिंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, राजेंद्र टिळेकर व शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी देखील चिरंजीव ओंकार, अनुराधा बेंडभर मॅडम यांचे कौतुक करत शाळेच्या नवोदय विद्यालय निवड परीक्षेतील यशस्वी गगन भरारी साठी समाधान व्यक्त केले.