उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केलिव आर्थिक मदत

Swarajyatimesnews

माझी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ३२ लाखांच्या कर्जाची रक्कम कुटुंबियांकडे सुपूर्त

देहू – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी नुकतीच आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं. कर्जाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेला चिठ्ठीत केला होता. ३२ लाखाच्या कर्जाची रक्कम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्या मार्फत मोरे कुटुंबियांना सुपूर्द केली आहे.

पाच फेब्रुवारी रोजी शिरीष महाराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे देहूत एकच खळबळ उडाली होती. शिरीष महाराज यांनी चार चिठठ्या लिहून ठेवल्या होत्या. पैकी, एका चिठ्ठीत त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज असल्याचा उल्लेख करत ते कुणाकडून घेतले त्यांच्या नावासह नमूद करण्यात आलं होतं. अखेर चार दिवसांनी शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेऊन विजय शिवतारे यांच्या मार्फत कर्जाची रक्कम मोरे कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवतारे म्हणाले, “देव, देश आणि धर्मासाठी शिरीष महाराज लढले. 

काही अडचणीमुळे ते आपल्याला सोडून गेले”. ज्या समाजासाठी जनजागृती करत होते. त्या समाजाने माझं देणं फेडावं अस उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला होता. त्यांनी ३२ लाखाच्या कर्जाविषयी माहिती दिली असती तो प्रसंग घडू दिला नसता. कर्तव्य आणि नैतिकता म्हणून एकनाथ शिंदे यांनी कर्जाची रक्कम दिली. महाराजांच लक्ष हे हिंदूंना जाग करणं होत. ते धर्म रक्षण करत होते. त्यांनी आत्महत्या करायला नको होत्या. अशा शब्दात विजय शिवतारे यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच मंत्री नितेश राणे यांनी देहूत येऊन मोरे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!