देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : ताहाराबाद (कुरणवस्ती) येथे ३० वर्षीय रमेश ऊर्फ रामा भाऊसाहेब गांगड याने २८ डिसेंबर २०२४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस तपासात पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे.
रमेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये पत्नी ताराबाई हिचे रवी गांगड याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी रमेशच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताराबाई गांगड, रवी गांगड, व सचिन गांगड यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत एक आरोपी सचिन गांगड याला ताब्यात घेतले, मात्र मुख्य आरोपी रवी गांगड व ताराबाई हे फरार होते. पतीच्या दशक्रियेनंतर पोलिसांनी ताराबाईचा शोध लावून तिला ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येत असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रविंद्र कांबळे, अविनाश दुधाडे यांच्या पोलिस पथकाने ताहाराबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला.यातील एक आरोपी सचिन एकनाथ गांगड त्याला ताब्यात घेतले.
मात्र मुख्य आरोपी रवी गांगड व मयताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते.त्यांनतर त्यांच्या शोधार्थ राहुरी पोलिस पथके अनेक ठिकाणी रवाना झाले होते.पतीच्या दशक्रिया विधीनंतर म्हणजे गेल्या दहा दिवसांनंतर अनैतिक संबंधातील पत्नीचा पोलिसांनी शोध घेतला आणि तिला ताब्यात घेतले आहे.