हवेलीतील पेरणे फाटा येथे लग्नाच्या स्टेजवरून वरमाईचे दिड लाख रुपये केले लंपास

स्वराज्य टाईम्स न्यूज

महिला भगिनींनो सावधान लग्नात सोन्याच्या दागिन्यांची चोरी होऊ नये रहा सावध

पेरणे फाटा (ता.हवेली) येथील एका लग्न समारंभामधून नवरीच्या आईचे तब्बल दीड लाख रुपये लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) नगर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली आहे.(An incident has come to light in which Rs. 1.5 lakh was looted from the bride’s mother during a wedding ceremony in Perne Phata (Haveli). This incident has created a stir in the area. This incident took place on Saturday (23rd) at a wedding hall on Nagar Road.)

याबाबत माधुरी रमेश साळुंके (वय-५४, रा. राजेंद्रनगर, वडगावशेरी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी साळुंके यांच्या मुलीचा विवाह नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. शनिवारी हा विवाह सोहळा पार पडला. विवाह समारंभानंतर फिर्यादी वधू-वराबरोबर छायाचित्र काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पिशवीत केटरिंग व इतरांचे पैसे देण्यासाठी ठेवले होते. त्यांनी ही पिशवी स्टेजवर ठेवली होती. चोरट्यांनी संधी साधत रोकड ठेवलेली पिशवी पळवून नेली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे आहेत.

भगिनींनो लग्नाला जातात सावधान – पेरणे फाटा येथील नगर रोड लगत लग्नासाठी येणाऱ्या महिला भगिनींनी काळजी घ्यायला हवी, मोठ्या प्रमाणात दागिने घातलेल्या महिला भगिनींना टार्गेट केले जात असून अचानक चोर येऊन गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली असून चोरांपासून सावध राहत आपल्या दागिन्यांची सुरक्षितता करायला हवी, चोरी झाल्यावर तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला हवी ,याबाबत लोणीकंद पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
en_USEnglish