सरकारी कार्यालये आता एक क्लिकवर; ‘पीजीआरएस’ प्रणालीने कामकाजाला नवी दिशा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यात जनतेचे अर्ज, निवेदने आणि तक्रारी यावर तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिड्रेसल सिस्टिम (PGRS) या ऑनलाईन प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रणालीद्वारे अर्जदारास त्याच्या अर्जाची सद्यस्थिती एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. शासनाच्या तंत्रज्ञानाधिष्ठित कामकाज धोरणानुसार ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्याधिकारी आशा पठाण यांनी या प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली.
या बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.