चाकणला  नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अत्याचार

Swarajyatimesnews

मेदनकरवाडी (ता.खेड) चाकण पोलिस स्टेशन परिसरात एक खळबळजनक व   संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (१३ मे) ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली असून आरोपीला पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्रपाळीत कामासाठी कंपनीत निघाली होती. या वेळी आरोपीने तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत नेत निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.आरोपीने महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी नेत असताना तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरोपीचा चावाही घेतला.

  या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला पोलिसांनी चोवीस तासांत बेड्या ठोकल्या आहेत. २७ वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती. एका कंपनीत ही पीडित महिला हेल्पर म्हणून काम करायची. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने  मागील बाजूस नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

महिलेने जोरदार प्रतिकार केला, आरोपीला चावा देखील घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं. महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आणि पकडण्यात चाकण पोलिसांना यश आलं. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे, मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का? याचा तपास ही केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!