वाघोली (ता. शिरूर): बीजेएस महाविद्यालयात “कॅपॅसिटी बिल्डिंग अँड सॉफ्ट स्किल्स” समितीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत मान्यवर मार्गदर्शकांनी अनुभवांचे मौल्यवान मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. रविंद्र सिंग परदेशी म्हणाले, “चार भिंतीतील शाळा हे केवळ ज्ञानदानाचे स्थळ नसून, आयुष्याच्या व्यापक दृष्टीकोनाचा पाया रचणारे स्थान आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करताना सर्वसमावेशक विचार पद्धती अंगीकारावी.” असे मार्गदर्शन केले.
उज्वल तावडे सर यांनी “क्षणिक सुखासाठी दीर्घकाळाचे नुकसान टाळा, मनापासून प्रयत्न करा – आयुष्य नक्कीच सुंदर होईल,” असा आशावादी संदेश दिला.
वंदना दांडेकर मॅडम यांनी, “जे काही करा ते मनापासून करा – हेच जीवनाला उंची देणारे आहे,” असे प्रेरणादायी विचार मांडले.
या कार्यशाळेला प्रदीप कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सत्यजित चितळे, निखिलेश जठार, डॉ. संजय गायकवाड, डॉ. मनिषा बोरा, प्रा संजयमानवतकर सर, नम्रता पाचर्णे, कोटरेश सर, कुणाल वारुळे यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रोहिणी शेवाळे व प्रा. ब्राम्हणे सर, प्रा.अस्मिता तायडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
समारोपप्रसंगी रेश्मा महाजन, वैष्णव ढेरे, आनंद इंगळे, मयुरी नाईक, सुनीता असननर, ऐश्वर्या जाळकर, आकाश वागस्कर, वैष्णव यांना त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र आणि उत्तेजनार्थ बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे, तर जीवनदृष्ट्याही अमूल्य शिकवण मिळाली. मयुरी नाईक,यावेळी ऐश्वर्या जाळकर, आकाश वागस्कर,वैष्णव, विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारी कार्यशाळा बीजेएस महाविद्यालयात उत्साहात संपन्न!
