पुणे: रक्षाबंधनाचा पवित्र सण बी. जे. एस. महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली.
स्थानिकच्या अध्यक्षा रुपाली गुलालकरी आणि सचिव सहदेव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्वच स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला, ज्यामुळे एकोपा आणि सुसंवादाचा सुंदर संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य रमेश गायकवाड, डॉ. एस. व्ही. गायकवाड, डॉ. बी. बी. लांडगे, डॉ. ज्योतिराम मोरे, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. मनिषा बोरा, डॉ. भूषण फडतरे, डॉ. , प्रा.डी एन पाटील, प्रा. सुभाष शिंदे आणि शाम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.