अनिल सातव पाटील यांनी घडवले १२ हजार नागरिकांना महाकाल दर्शन

Swarajyatimesnews

पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांची उल्लेखनीय जनसेवा

पुणे :जनसेवेचा अखंड ध्यास घेत कार्यरत असणारे पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांनी आजवर तब्बल १२ हजार नागरिकांना मोफत उज्जैन महाकाल दर्शन घडवून समाजसेवेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. श्रद्धावान भाविकांची बाबा महाकालांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने त्यांनी मोठ्या प्रमाणात ही भव्य यात्रा आयोजित केली.

यात्रेत सहभागी भाविकांसाठी पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत ने-आण, त्यानंतर विशेष रेल्वेद्वारे उज्जैन प्रवास, तसेच उज्जैनमध्ये मोफत निवास व भोजनाची सोय अनिल सातव पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आली. महाकालेश्वर मंदिरासोबतच उज्जैनचा पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा दाखविण्याची विशेष काळजी आयोजकांनी घेतली.

सुव्यवस्थित व सुरक्षित आयोजन : यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी ट्रेनमध्ये भोजन व नाश्त्याची सोय
,चहा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांच्या टीमकडून प्रकृती तपासणी
, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मदत
या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण यात्रा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.

एका भाविकाने सांगितले, “सुव्यवस्थित व्यवस्था, सुरक्षितता आणि उत्तम सेवा यामुळे संपूर्ण प्रवास आनंददायी झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशी उत्तम यात्रा पाहणे दुर्मिळ आहे.”


“जनसेवा हीच माझी खरी प्रेरणा आहे. नागरिकांची श्रद्धा व भावना लक्षात घेऊन मोफत महाकाल दर्शन यात्रेचे आयोजन केले. विविध टप्प्यांमध्ये १२ हजार नागरिकांना दर्शन घडवता आले, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ही सेवा पुढील काळातही सुरू राहील.”
-अनिल सातव पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!