सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २० लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन

स्वराज्य टाईम्स न्यूज

सणसवाडी (ता. शिरूर) येथील डोंगरवस्ती-पिंपळे जगताप रोड या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांची मागणी आणि परिसरातील रहदारीच्या सोयीसाठी हे काम हाती घेण्यात आले आहे.

     आमदार अशोक पवार यांनी , “सणसवाडीत आजवर अनेक विकास कामे करण्यात आली आहेत, आणि भविष्यातही नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामांवर भर दिला जाणार असून स्थानिकांनी “विकास कामे दर्जेदार ,गुणवत्ता पूर्ण व वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवावे कामात हलगर्जीपणा चालणार नसून  दर्जा व गुंवतात यांच्याशी ताधिड होणार नसल्याचे सांगितले.

Swarajyatimesnews

सणसवाडीतील हा रस्ता परिसरातील रहिवाशांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.

यावेळी उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच रूपाली दरेकर ,उपसरपंच राजेंद्र दरेकर ,माजी संचालक दत्तात्रय हरगुडे ,काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर ,रांजणगाव देवस्थानचे माजी अध्यक्ष व माजी उपसरपंच ॲड.विजयराज दरेकर,समता परिषदेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ ,ग्रामपंचायत सदस्या सुनंदा दरेकर, शशिकला सातपुते ,ललिता दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, कैलास दरेकर, गोरक्ष दरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास दरेकर, उद्योजक दगडू दरेकर, रामदास दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, दिंडीचे  सचिव मोहन दरेकर, उद्योजक प्रशांत दरेकर ,निलेश दरेकर ,सुखदेव दरेकर ,विठ्ठल दरेकर, सुभाष दरेकर, दत्तात्रय शेळके विकास हरगुडे, रामदास हरगुडे, गणेश दरेकर, उत्तम दरेकर,राजेंद्र दादाभाऊ दरेकर, प्रवीण वाखारे, अशोक करडे, पंढरीनाथ गोरडे, प्रा.अनिल गोटे,रामेश्वर पाटील,प्रदिप म्हेत्रे तसेच सणसवाडी डोंगर वस्ती ,साईनाथ नगर, प्रियंका नगर ,यादव वस्ती ,ग्रामस्थ व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!