निष्ठावंत, प्रामाणिक , जनतेचे आधारवड आमदार अशोक (बापू) पवार

Swarajyatimesnews

एक आशा, एक विश्वास, एक नेतृत्व आणि नावीन्यतेचा ध्यास

शिरूर-हवेली मतदारसंघाचे लाडके आणि कर्तव्यदक्ष आमदार अशोकबापू पवार हे नाव जिथे उच्चारले जाते, तिथे विकास, समाजसेवा आणि नेतृत्वाच्या आदर्शांचा उलगडा होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी दिशा, वेगळा विचार, आणि ध्येयवादी आचार आहे. देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सहकारमहर्षी (स्व.) रावसाहेबदादा पवार यांच्या सेवेचा आणि विकासाचा वारसा पुढे नेण्याचे कार्य आमदार अशोकबापू पवार अत्यंत यशस्वीपणे करीत आहेत.

आमदार अशोक पवार यांचा जीवनप्रवास म्हणजे निष्ठा, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, आणि विकासाच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या नेतृत्वाचा एक अनोखा संगम आहे. शरद पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सहकारमहर्षी (स्व.) रावसाहेबदादा पवार यांचा सेवेचा आणि विकासाचा वारसा पुढे नेणारे अशोक पवार आज शिरूर-हवेली मतदारसंघात विकासाचे  प्रतीक म्हणून ओळखले जातात.

निष्ठा आणि प्रामाणिकपणा – आमदार अशोक पवार यांनी राजकारणात प्रवेश करताना आदर्श म्हणून शरद पवार साहेबांना मानत, त्यांच्या नेतृत्वाखाली  सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा त्यांच्या प्रत्येक कार्यात दिसून येतो. जनतेच्या हितासाठी काम करताना त्यांनी कधीच तडजोड केली नाही.

     मध्यंतरी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या पण आमदार अशोक पवार यांनी निष्ठा व प्रामाणिकपणा यांच्याशी तडजोड न करता शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निष्ठेबाबत आता पुणे जिल्ह्यातील ते राजकारणातील एक आदर्श उदाहरण म्हणून राज्याचे नेते वारंवार उल्लेख करतात. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा मतदारसंघातील विकासाची बाब असो, अशोक पवार यांनी त्यांच्या कार्यात प्रामाणिकपणाचा धागा कायम ठेवला आहे

शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित कार्य – आदरणीय शरद पवार साहेबांच्या कृषी, सहकार, आणि औद्योगिक क्षेत्रातील कार्याची प्रेरणा घेत, अशोकबापू पवार यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घोडगंगा साखर कारखान्याची प्रगती, चासकामान पाणी नियोजन, शेतकऱ्यांचे विधिमंडळात मांडलेले प्रश्न या सर्व कामांमध्ये त्यांची तळमळ आणि दूरदृष्टी दिसून येते.  अन्यायाविरुद्ध लढणारा आणि न्यायासाठी उभा राहणारा नेता म्हणून अशोकबापू पवार यांची ओळख निर्माण झाली आहे. कोणताही अन्याय झाल्यास, बापू त्याला ताकदीने सामोरे जातात आणि मदतीसाठी सदैव तत्पर असतात.

सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने प्रेरित – आमदार अशोकबापू पवार यांचे नेतृत्व केवळ शिरूर-हवेली मतदारसंघापुरते मर्यादित नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श विकासाभिमुख नेता म्हणून ओळखले जातात. सहकार, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, कृषी, अध्यात्म, माहिती तंत्रज्ञान, उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कोणत्याही निर्णयामध्ये जनतेच्या हिताचा विचार अग्रस्थानी असतो. ते जनतेच्या अपेक्षा आणि समस्या समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

श्री छञपती संभाजी महाराज समाधी स्थळ विकास आराखडा – श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी खूप मोठे कार्य केले.प्रसंगी विधानसभेत याबाबत आवाज उठवत काम केले यामुळे श्री क्षेत्र तुलापुर, वढू बुद्रुक येथे स्मारकासाठी राज्यसरकारने ५३३ कोटी ५९ लाखांचा निधी उपलब्ध करून देत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

करोनाकाळातील आदर्श नेतृत्व – गेल्या काही वर्षांपूर्वी, जगभरात करोनाने थैमान घातले होते. अनेक नेते घरात सुरक्षित राहून या संकटावर मात करण्याचा विचार करत असताना, अशोकबापू पवार मात्र मतदारसंघात कार्यरत होते. स्वतःच्या पायाला भिंगरी बांधून त्यांनी चोवीस तास प्रत्येक गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली, उपाययोजना केल्या, आणि गरजूंना मदत केली. त्यांनी पाच कोविड सेंटर उभारून हजारो रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली. गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप करून, महापुराने ग्रस्त रायगड भागातील नागरिकांना संसारोपयोगी वस्तू आणि अन्नधान्य देण्याचा पुढाकार घेतला. या कठीण काळात त्यांच्या कार्याची दखल घेणे अपरिहार्य आहे.

जनतेच्या सेवेत तत्पर – आमदार अशोकबापू पवार यांचे जीवनकार्य जनतेच्या सेवेसाठीच समर्पित आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन करणे, अडचणींतून बाहेर काढणे, प्रशासकीय बाबींमध्ये मदत करणे, आणि एखाद्याला रुग्णालयात दाखल करून शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे यांसारखी अनेक कार्ये ते सातत्याने करतात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आज ते शिरूर-हवेली मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ‘बापू’ म्हणून ओळखले जातात.

प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा अभेद्य गड – अशोकबापू पवार यांचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा हे त्यांच्या नेतृत्वाचे खरे गमक आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा मतदारसंघातील कोणताही मुद्दा, त्यांनी नेहमीच न्यायाचा मार्ग धरला. त्यांच्या कार्याची पायाभरणीच जनतेच्या हिताच्या चिंतनावर आधारित आहे. त्यांच्या नजरेतून आणि ह्रदयातून प्रत्येक निर्णय घेतला जातो, ज्यामुळे त्यांचे नेतृत्व जनतेमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करते.

दूरदृष्टीचा दीपस्तंभ – अशोकबापू पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शिरूर-हवेली मतदारसंघातील विकास एक वेगळा उंचावला आहे. त्यांनी मतदारसंघाच्या गरजांची ओळख करून त्याच दिशेने धाडसाने पाऊले उचलली. कृषी, शिक्षण, आरोग्य, सहकार, क्रीडा, आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य त्यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दाखवते. विशेषतः जलसंधारण, पाणी नियोजन, आणि शेतकऱ्यांसाठी राबविलेले विविध प्रकल्प त्यांच्या कर्तृत्वाचे बोलके उदाहरण आहेत.

विकासाची कास धरलेले नेतृत्व – घोडगंगा साखर कारखान्याची प्रगती असो वा मतदारसंघात झालेल्या इतर महत्त्वपूर्ण कामांची यशस्वी अंमलबजावणी, अशोकबापू पवार यांनी शिरूर-हवेली तालुक्याच्या विकासासाठी आपली संपूर्ण ऊर्जा वाहिली आहे. रस्ते, पूल, शाळा, आणि आरोग्य केंद्रांच्या उभारणीतून त्यांनी मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे.

सहकार आणि क्रीडा क्षेत्रातील पुढाकार – सहकार क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विविध योजना राबवल्या. त्याचप्रमाणे, क्रीडा क्षेत्रात त्यांनी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामुळे शिरूर-हवेली तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय विकास झाला आहे.

जनतेचे आधारवड – अशोकबापू पवार यांचे जनतेशी असलेले नाते केवळ नेता-मतदार यापलीकडे गेले आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते सर्वसामान्य जनतेमध्ये ‘बापू’ म्हणून लोकप्रिय आहेत. 

उदंड आयुष्याच्या आणि यशाच्या अनंत शुभेच्छा – आमदार अशोकबापू पवार यांचा निस्वार्थ सेवाभाव, प्रामाणिकपणा, आणि दूरदृष्टी यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! असा ध्येयवादी आणि समाजाभिमुख नेता आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि ते यापुढेही आपले आदर्श नेतृत्व जनतेसाठी सातत्याने काम करत राहणार असून त्यांच्या निष्ठेचा व प्रामाणिकपणा यांच्यासह सर्वांगीण व्यापक जनहिताच्या कामाची पुण्याई म्हणून लवकरच ते राज्याच्या मंत्री मंडळात व पुणे जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान होवोत ही मनःपूर्वक शुभेच्छा !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!