राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घोडगंगा कारखान्याला १६० कोटी रुपये देऊ –  जयंत पाटील

स्वराज्य टाईस्म

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे राज्यात महाविका आघाडीचे सरकार येणार ही काळया दगडावरील  रेघ असून सरकार येताच  मंत्री मंडळाच्या पहिल्या बैठकीत अशोक पवार यांच्या कारखान्यास  १६० कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अशोक पवार यांच्या प्रचार सभेत सभेत दिले.

       महाराष्ट्रात सर्वात अडचणीत असणाऱ्या वाई येथील कारखान्यास  ६०० कोटी रुपयांचे कर्ज असताना एन सी डी सी ने ५०० कोटी रुपयांचे कर्ज दिले याला मेरिट काय ? तो कारखाना चालवणारे त्यांच्या पक्षात गेले म्हणून संरक्षण. ॲड अशोक पवार शरद पवार यांच्याशी निष्ठावंत, एकनिष्ठ ,प्रामाणिक राहिले म्हणून कर्ज नाही हे साधे गणित आहे.

यावेळी जयंत पाटील यांना १४०० कोटी दिले या केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वक्त्यावावर व्यक्त झाले असून  माझा कारखाना माझा कारखाना खड्ड्यात गेला नाही,एस सी डी सी च्या दरता जात नाही,सगळ्यात एक नंबरणे रिपे करणारा आमचा कारखाना आहे.१४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असते तर कारखाना खाली बसला असता.यावर मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते कळायला वेळ आहे.यांना एस सी डी सी चा गैरवापर करण्याची सवय चालू झाली असून माणसांना वाकवायचे हा उद्योग दिल्लीतील सरकार करत आहे.कर्ज दिलेल्या २० कारखान्यांपैकी एकाही कारखान्याला मेरिट नाही.अशोक पवार तिकडे गेले नाही म्हणून कारखान्याला कर्ज घेण्याची परवानगी नाही.शेवटी कोर्टाने सांगितले १०७ कोटी रुपये राखून ठेवा म्हणून सांगितले ते कोर्टालाही पटले.

जयंत पाटलांकडून अशोक पवार यांच्या एकनिष्ठ तेचे कौतुक –  ॲड.अशोक पवार स्वाभिमानाने राजकारण करता. सगळ्यांचे शिव्याशाप खाऊन एकनिष्ठ राहिले एकमेव आमदार आहात त्यामुळे तुमचे कौतुक.निष्ठेची पूजा होते. प्रामाणिक पणाची पूजा होते चोर लफांग्याचे नाव परत निघत असे म्हणत अशोक पवार यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक करत मुलगा ऋषीराज पवार यांच्या अपहरण ,मारहाण प्रकरणी राजकारणातील वळणाच्या बाबतीत चिंता व्यक्त केली.

जयंत पाटील यांनी सांगितली पंचसूत्री – महालक्ष्मी योजना प्रती महिना ३ हजार,महिलांसाठी एस टी प्रवास मोफत,शेतकऱ्यांना कर्जमाफी, चार हजार बेरोजगार भत्ता, आरोग्य विमा कुटुंबासाठी २५ लाखांपर्यंत, राज्याची घसरलेली पत, महाराष्ट्रातून बाहेर जाणार उद्योग, रोजगार गेला, महाराष्ट्राने गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारले,दरडोई उत्पन्न घसरले,भारताच्या संपत्तीतील वाटा १५ वरून १३ टक्के झाली असून भ्रष्टाचार केला असून छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाल्ले असा घणाघाती आरोप करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!