सणसवाडी (ता. शिरूर) युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हायला हवे. उद्योग एका दिवसात उभा राहत नाही त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत व्यवसायात झोकून द्यावे लागते तेंव्हा व्यासायात यश मिळते त्यासाठी सातत्याने कष्ट,त्याग,नियोजन व उत्तम व्यवस्थापन गरजेचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी गुंतवणूक आणि विमा सल्लागार साईनाथ साहू व शंभूनाथ साहू यांच्या एसएस ब्रदर्स सर्व्हिसेसच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त केले.
यावेळी माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, उद्योगनगरी सणसवाडीच्या सरपंच रुपाली दगडू दरेकर ,उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, माजी सरपंच संगिता नवनाथ हरगुडे, काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, माजी उपसरपंच युवराज दरेकर,मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, उद्योजक रामदास दरेकर , उद्योजक दगडू नाना दरेकर ,माजी चेअरमन कैलास दरेकर , उद्योजक प्रशांत दरेकर, विठ्ठल दरेकर, उत्तम दरेकर, प्रदीप म्हेत्रे, राजेंद्र दरेकर, प्रा.अनिल गोटे, पंढरीनाथ गोरडे अशोक करडे व इतर मान्यवर उपस्थित होते