महाविकास आघाडीतील शिलेदार शरद पवारांचा, प्रचार जोरदार तुतारीचा
सणसवाडी (ता. शिरूर)येथे प्रत्येक मतदार व कुटुंबीयांशी संवाद साधत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड.अशोक पवार यांच्या प्रचारासाठी सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते,नेते व विविध पदाधिकाऱ्यांनी उद्योगनगरी सणसवाडी येथे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा घराघरातील माणसा माणसापर्यंत प्रचार करण्यात येत असून सणसवाडी करांनी शिरूर हवेली मतदार संघात आघाडी घेतली आहे.
शिरूर हवेली मतदार विशेषतः पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात चर्चेत असणारा व अनेकांचे लक्ष वेधनारा मतदार संघ असून शरद पवार यांच्याशी निष्ठा बाळगत त्यांच्या सोबत राहणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या बाबत चर्चेचा ठरला असून विरोधकांचे उमेदवारी बाबत खेचाखेची सुरू असून दुसरीकडे आमदार अशोक पवार यांची यंत्रणा मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे.
उद्योगनगरी सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, व इतर सहघटक पक्ष यांच्या सह विविध कार्यकर्ते, नेते,पदाधिकारी व महिला भगिनी यांनी सणसवाडी येथील विविध वाडी वस्ती व गावातील मतदार बंधू भगिनींच्या प्रत्यक्ष वैयक्तिक भेटी गाठी घेत त्यांना आमदार अशोक पवार यांचे पत्रकांचे वाटप करत शरद पवार व महॅसिकास आघाडी तसेच विकास कामे, हॉस्पिटल, कोरोणा काळातील काम यासह विविध केलेली कामांबाबत माहिती देत आमदार अशोक पवार यांच्या प्रचारात मोठी आघाडी घेतली असून शिरूर हवेली मतदार संघातील सणसवाडी गाव मात्र प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करणारे व मतरांशी वैयक्तिक भेटीगाठी घेत घरोघर प्रचार पत्रक वाटणारे व भेट घेणारे महा विकास आघाडीचे गाव ठरले आहे.