Breaking महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान २३ निकाल

Swarajyatimesnews

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.१५) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल २३ नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत.

निवडणुकीची तारीख जाहीर : – निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होटरॲप वरून मतदार सर्व माहिती तपासू शकतात. तसेच तुमचा उमेदवार कोण आहे हे देखील तपासता येणार आहे. याशिवाय पैसे, मद्य, ड्रग्ज यावर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व पोलिंग स्टेशन २ किमीच्या आत असावेत.

महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

निवडणुकीचे नोटिफिकेशन : २२ ऑक्टोबर २०२४

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर 

अर्जांची तपासणी : ३० ऑक्टोबर २०२४

अर्ज मागं घेण्याची तारीख : ४ नोव्हेंबर 

मतदान : २० नोव्हेंबर २०२४

मतमोजणी : २३ नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

   महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या.

राज्यातील पक्षांसाठी आव्हानात्मक निवडणूक –   शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी तसेच पक्षांसाठी  ही निवडणूक महत्त्वाची व आव्हानात्मक असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी १ लाख १८६ मतदान केंद्र असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. तसेच महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. याशिवाय आगोगाने ८५  वर्षांवरील नागरिकांना घरून मतदान करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!