तातडीने दुरुस्तीची करण्याची नागरिकांची मागणी.
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील फडतरे वस्ती जवळच वढू रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या घराशेजारी, गाळ्यामध्ये कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या गटार लाइनचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्न निरमन झाला असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करत ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
येथे स्थानिक नागरिक व भाडेकरू राहत असल्याने गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने लहान मुले,महिला, वृद्ध यांच्या आरोग्याला कोणतीही हनी होऊ नये यासाठी ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने गटार लाईन दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणीयाबाबत संजय शिवले, कौस्तुभ साळुंखे, रमेश घारे, अनिल फडतरे यांनी अर्ज केला आहे.
कौतुभ साळुंखे यांच्या गाळ्यामध्ये ग्राम पंचायतीच्या गटार लाईनचे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे.लागेल दोन ते तीन महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत असून याबाबत स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे तसेच सदर गटाराचे पाणी गाळ्यामध्ये गेल्याने कौस्तुभ साळुंखे यांना दुसरा गाळा भाड्याने घ्यावा लागला असून भड्यापोटी ३६ हजार रुपये भाडे द्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले.स्वतःचा गाळा असूनही त्याचा वापर करता येत नाही ते फक्त ग्राम पंचायतीच्या गलथान आणि ढिसाळ कारभारामुळे झालेले आर्थिक व व्यावसायिक नुकसान कोण भरून देणार असा प्रश्न कौस्तुभ साळुंखे विचारत आहेत.