विविध मालिकांमधील तारकांची लाभणार उपस्थिती
आव्हाळवाडी (ता. हवेली)गणेश (बापू) कुटे युवा मंचच्या वतीने आव्हाळवाडी येथे रविवारी अखिल दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मालिकांमधील कलाकारांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे, विशाल कुटे, अजित कुटे, तुषार कुटे व गणेश (बापू) कुटे युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेश (बापू) कुटे युवा मंचच्या वतीने आव्हाळवाडी येथे रविवारी (दि. २५ ऑगस्ट) रात्री ७ ते १० वाजचा भव्य अखिल दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला स्वाती शरद मोहळ व हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांची प्रमुख उपस्थितीती लाभणार आहे. तर प्रमुख आकर्षण म्हणून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका फेम माधवी निमकर, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका फेम प्राजक्ता गायकवाड, लावणी सम्राज्ञी (मुंबई) राधा पाटील, सानिका निर्मळ, अदिती कांबळे, महिमा वाघमोडे व अभिनेता विजय गोते यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी १ लाख रुपयांचे बक्षित ठेवण्यात आले आहे.