पुणे ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न लावणाऱ्याला दंड नाही तर बांधली ‘सुरक्षेची राखी’

Swarajyatimesmews

अरे दादा तू स्वतः सुरक्षित राहशील तर बहिणीची रक्षा करशील ना ? पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेचा व्हिडिओ व्हायरल 

पुणे – सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या व असुरक्षित प्रवास करणाऱ्यांची लक्षणीय वाढली असून ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढत असताना ट्रॅफिक पोलिसांनी राखी पौर्णिमेचा निमित्त सादर एक अनोखा उपक्रम सुरू केला. याबाबत सामाजिक जागृती करणारा व्हिडिओ पुणे पोलिसांनी आयुक्त अमितेश कुमार यांनी पोस्ट केला आहे.

रक्षाबंधन सणाला भाऊ आपल्या बहिणीला संरक्षणाचे वचन देतो आणि बहीण भावाला राखी बांधते.या भारतीय सांस्कृतिच्या परंपरेशी सांगड घालत सीट बेल्ट न लावणाऱ्यांसाठी जनजागृतीची अनोखी शक्कल लढवत  पुणे ट्रॅफिक पोलिसांनी भावांना सुरक्षेची राखी बांधलीये. (Pune police)

सीटबेल्ट न घालणाऱ्यांचे प्रबोधन ..  पुण्यातील महिला ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न घालणाऱ्यांना दरडवण्याऐवजी आता सुरक्षेची राखीच बांधली आहे. शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तसेच पोर्से कार अपघातासारख्या घटना होऊ नयेत यासाठी पुणे ट्रॅफिक महिला पोलिसांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय. एरवी नियम मोडला की पावती फाडणाऱ्या महिला ट्रॅफिक पोलीस आज चक्क सीटबेल्टच महत्त्व समजावून सांगत सीटबेल्ट सारखी दिसणारी राखी घालून सुरक्षेची राखी बांधताना दिसतायत. विशेष म्हणजे सीट बेल्ट सारखी दिसणारी राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून आयुष्यभर सीट बेल्ट घालून प्रवास करेन असं वचन सुद्धा त्या भाऊरायाकडून घेतायत.

या उपक्रमाची चित्रफीत पुणे पोलिसांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

https://www.instagram.com/reel/C-1srxdoSगwV/?igsh=MWZ4bGNtbjVwczc3cQ==

पुणे पोलिसांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

वाढणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जात असून पुणे पोलिसांनी या व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. आणि नागरिकांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नाते अतूट प्रेमाचे! भाऊ म्हंटलं की बहिणीच्या मायेचं पारडं त्याच्यासाठी नेहमीच भरलेलं असतं, प्रत्येक बहिणीसाठी त्याचे जीवन सुखकर आणि उदंड आयुष्याचे असावे असे तिला वाटते. म्हणूनच या मायेची जाणीव ठेऊन या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला या सुरक्षेचे वचन द्या. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!