माजी आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच शशिकला सातपुते यांचा सत्कार

Swarajyatimesnews

निष्ठा, एकी आणि नेकीची परंपरा जपणारे गाव म्हणजे सणसवाडी, ” कै. दत्ताभाऊंची निष्ठा आणि सणसवाडीची एकी विसरण्यासारखी नाही” माजी आमदार ॲड. अशोक पवार

सणसवाडी (ता. शिरूर): सणसवाडी गावच्या ग्रामस्थांनी जपलेली निष्ठा, एकी आणि नेकीची गौरवशाली परंपरा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. शशिकला रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड होताच संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले. या महत्त्वपूर्ण घटनेचा गौरव करण्यासाठी माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी स्वतः सणसवाडी येथे उपस्थित राहून शशिकला सातपुते यांचा सत्कार केला आणि गावकऱ्यांचे विकासाच्या वाटचालीबद्दल अभिनंदन केले.

‘सणसवाडी माझे कुटुंब, इथले लोक माझी ताकद’ – माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी सणसवाडी गावाशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “राजकारणात पदे येत-जात असतात, पण निष्ठावान माणसे आयुष्यभर सोबत राहतात. सणसवाडीने मला प्रत्येक सुख-दुःखात साथ दिली आहे आणि दिलेला शब्द कधीच मोडला नाही. त्यामुळे सणसवाडी हे माझे कुटुंब आहे आणि इथले लोक माझी खरी ताकद आहेत.
“गावाच्या राजकीय परंपरेचे कौतुक करताना पवार म्हणाले, “येथील लोकांनी ठरलेल्या वेळी प्रत्येक सहकाऱ्याला पद दिले. कुठलाही विरोध, अडथळा किंवा भांडण न करता गावाची प्रगती साधली. राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी कसे करायचे, याचा आदर्श सणसवाडीने सर्वांसमोर ठेवला आहे.”


विकासकामांची यशस्वी परंपरा – माजी आमदार म्हणून आपल्या कार्यकाळात सणसवाडीसाठी केलेल्या विकासकामांची आठवण पवारांनी करून दिली. त्यांच्या प्रयत्नातून गावात रस्त्यांची सुधारणा, सांडपाणी गटार लाईनचा विस्तार, आणि सोलर पथदिव्यांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलला. हा सर्व विकास लोकांच्या एकीचा आणि निष्ठेचाच परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कै.दत्ताभाऊ नामदेव हरगुडे यांची भावनिक आठवण : यावेळी माजी आमदार ॲड अशोक पवार यांनी माजी उपसरपंच कै.दत्तात्रय नामदेव हरगुडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “दत्ताभाऊ हे एकनिष्ठ, मनमिळाऊ आणि लोकांसाठी झटणारे कार्यकर्ते होते. त्यांची कमतरता आजही जाणवते. दत्ताभाऊ म्हणजे दिलदार मनाचा एकनिष्ठ सहकारी म्हणून कायम स्मरणात राहतील,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
शशिकला सातपुते यांच्या बिनविरोध निवडीमुळे गावातील विश्वास, एकी आणि प्रामाणिकतेचे प्रतीक जपले गेले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यांची निवड ही सणसवाडीच्या राजकीय परंपरेला पुढे नेणारी असून आगामी काळात गावाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी गती मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, शिरूर बाजार समितीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, सणसवाडीच्या मा़जी सरपंच रूपाली दरेकर, संगीता हरगुडे. , शिरूर काँग्रेस अध्यक्ष वैभव यादव , माजी उपसरपंच विजयराज दरेकर, माजी सरपंच रमेश सातपुते, उद्योजक दगडू दरेकर.नवनाथ हरगुडे.l, माजी चेअरमन सुहास दरेकर, ग्माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर, रामदास दरेकर, उद्योजक सुभाष दरेकर , विठ्ठल दरेकर, संदीप भुजबळ , निलेश दरेकर प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर ,प्रवीण वाखारे ,शाम दरेकर, प्रदीप म्हेत्रे ,संतोष शेळके, श्री लालू दरेकर , बाळकृष्ण दरेकर, गणेश हरगुडे ,अशोक करडे ,पंढरीनाथ गोरडे अनिल गोटे सर आणि सणसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!