हडपसर रेल्वे स्थानक हरहर महादेव–जय श्रीरामच्या घोषणांनी
हडपसर (ता. हवेली), दि. २० नोव्हेंबर – लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जनतेच्या मनात मुलासारखे स्थान मिळवलेल्या पै. किरण साकोरे यांच्या काशी-अयोध्या तिसऱ्या देवदर्शन यात्रेस आज हडपसर स्थानकावरून भव्य प्रस्थान केले. रेल्वे स्थानकात भाविकांनी “हर हर महादेव… जय श्रीराम… जयघोष करत पूर्ण होवो किरण साकोरे यांच्या मनातील प्रत्येक काम!” अशा शुभेच्छा दिल्या. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि लहान मुलांसह सर्व वयोगटातील हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती ही किरण साकोरे यांच्या व्यापक जनसंपर्क व लोकसेवेला मिळालेला आशीर्वाद आहे .
‘प्रदिपदादा कंद युवा मंच’ आणि ‘पै. किरण साकोरे मित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही तिसरी रेल्वे यात्रा भाविकांच्या उदंड प्रतिसादाने विशेष ठरली. काशी विश्वनाथ, गंगा आरती आणि प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील रामलल्ला दर्शनाची सुवर्णसंधी मिळत असल्यामुळे यात्रेबद्दल गावागावातून उत्साह व्यक्त केला जात आहे.हडपसर रेल्वे स्थानकावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांच्या हस्ते रेल्वेचे पूजन करण्यात येऊन हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यावेळी माजी उपसभापती रविंद्र कंद, भाऊसाहेब झुरुंगे, गौरव झुरुंगे, माजी सरपंच अनिल चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) हवेली तालुकाध्यक्ष रसिका चोंधे, माजी चेअरमन कल्याण शिंदे, चेअरमन रामभाऊ काकडे, माजी सरपंच भारत काकडे, माजी चेअरमन सुनील काकडे, सरपंच दिपाली वैभव शिंदे, माजी सरपंच शिवानी शिंदे, माजी चेअरमन भीमाजी कदम, बंडू मगर, रमेश भामगर , राहुल तांबे, सरपंच महेश कदम यांच्यासह विविध मान्यवर, भाविक भक्त ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्ही माझे कुटुंब आहात” – प्रदिप विद्याधर कंद पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी भाविकांना शुभेच्छा देत साकोरे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. “तुम्ही माझे कुटुंब आहात. प्रवासात कोणतीही कमतरता पडू देणार नाही. काही लागले तर लगेच सांगा,” अशी प्रेमळ काळजी त्यांनी यात्रेकरूंसोबत संवाद साधताना व्यक्त केली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने हजारो भाविकांना काशी–अयोध्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे मोठे पुण्यसंचयाचे कार्य आहे, जसे भाविकांच्या सेवेसाठी किरण साकोरे कुठेही कमी पडत नाही तसेच या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, माणुसकी असलेला सर्वसामान्य कुटुंबातील तरुणावर लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता भरभरून प्रेम करत असून किरण साकोरे हे जनतेच्या मनातील विश्वसनीय आपला माणूस म्हणून स्थान मिळवले असल्याचा विश्वास व्यक्त केला

माजी चेअरमन कल्याण शिंदे यांनी“किरण साकोरे यांच्यावर भाविकांचा विश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे; त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जनता उभी राहील, जनतेच्या मनात त्यांचे आपल्या घरातील मुलासारखे प्रेम व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे,” असे मत व्यक्त केले.

यात्रेच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे सेवा, भक्ती आणि समर्पणाचा अनुभव सर्व भाविकांनी येत आहे.पै.किरण साकोरे यांनी आपल्या निष्ठा, सेवाभाव आणि कार्यशैलीद्वारे लोणीकंद-पेरणे गटातील जनतेच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भाविकांसाठीची ही तिसरी रेल्वे यात्रा केवळ एक आध्यात्मिक यात्रेसह सेवा, भक्ती आणि जनतेच्या विश्वासाचा एक अद्वितीय संगम ठरली आहे. भाविकांच्या उदंड उत्साहात आणि प्रतिसादात हडपसर रेल्वे स्थानक ‘हर हर महादेव-जय श्रीराम’ या घोषणांनी दुमदुमून गेले.
