‘हा गट सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार’ आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा विश्वास
अष्टापूर (ता.हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने केसनंद-कोरेगाव मूळ पुणे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेची उमेदवारी सुरेखा हरगुडे यांना तर पंचायत समितीची उमेदवारी संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांना जाहीर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जाहीर करताच टाळ्यांच्या व घोषणांच्या जल्लोषात उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी आमदार कटके यांनी हा गट सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार’ असल्याचा विश्वास आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी अष्टापूर फाटा येथे झालेल्या आशीर्वाद यात्रा मेळाव्यात ही अधिकृत घोषणा केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद,पुणे,हवेली बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप,यशवंत कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,ज्येष्ठ नेते बाळासाहेब चौधरी,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पठारे,नेते राजेंद्र टिळेकर,तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद गटातून सुरेखा रमेश हरगुडे तर केसनंद पंचायत समिती गणातून संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे – आमदार माऊली कटके यांनी जाहीर केल्यानुसार, केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातून सुरेखा रमेश हरगुडे यांना तर केसनंद पंचायत समिती गणातून संतोष पांडुरंग हरगुडे उर्फ एस.पी. हरगुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सेवाभावी नेतृत्वावर विश्वास – उमेदवारी जाहीर करताना आमदार कटके यांनी सांगितले की, रमेश हरगुडे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, त्यांनी शेती आणि व्यवसायाच्या माध्यमातून या परिसरात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उत्तम काम केले आहे. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचे कार्य केले आहे.

सर्वाधिक मतांनी निवडून येणार – आमदार माऊली कटके यांनी विश्वास व्यक्त केला की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा गट सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईल.

आशीर्वाद मेळाव्याला मोठा प्रतिसाद – सुरेखा हरगुडे आणि संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांच्या वतीने अष्टापूर फाटा येथील रामकृष्ण हरी मंगल कार्यालयात काशी-अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेनिमित्त आशीर्वाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जिल्हा परिषद गटातील जनतेचा हजारोंच्या संख्येने भरघोस प्रतिसाद लाभला.राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विकासाची ग्वाही – केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांनी प्रास्ताविकात बोलताना, आमदार कटके यांचे आभार मानले. ते म्हणाले, “आमच्या उमेदवारांना मायबाप जनतेचे आशीर्वाद मिळावेत. हे उमेदवार निश्चितच या गटाचा व गणाचा सर्वांगीण विकास करून दाखवतील आणि दिलेल्या संधीचे सोने करतील.” असा विश्वास व्यक्त केला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरेखा हरगुडे आणि संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांनी आमदार माऊली कटके यांचे आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे काम करण्याचे आश्वासन दिले.
