कोरेगाव भीमाच्या मातीतील संतू आनंदा ढेरंगे म्हणजे ‘लोकशाही सैनिक’ – माजी संचालक विठ्ठल ढेरंगे
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) महाराष्ट्र शासनामार्फत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावभिमा येथील संतू आनंदा ढेरंगे यांना १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
आणीबाणीच्या कठीण काळातही ढेरंगे यांनी लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या योगदानाचा महाराष्ट्र शासनाला अभिमान आहे, असे सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.हे सन्मानपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने शिरूरचे तहसीलदार यांच्या हस्ते ढेरंगे यांना प्रदान करण्यात आले.

१९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कठीण काळातही संतू ढेरंगे यांनी लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संतू आनंदा ढेरंगे यांनी हाल ,अपेष्टा, कष्ट सोसले त्यामुळे खऱ्या अर्थाने ते कोरेगाव भीमाच्या मातीतील संतू आनंदा ढेरंगे म्हणजे ‘लोकशाही सैनिक’ असल्याचे प्रतिपादन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल ढेरंगे यांनी केले.
यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय संभाजी ढेरंगे ,खरेदी विक्री संघ संचालक सत्यनारायण ढेरंगे , माजी चेअरमन शिवाजी बापूराव ढेरंगे,कानिफनाथ पतसंस्था चेअरमन नामदेव ढेरंगे, माजी उपसरपंच प्रकाश ढेरंगे, अध्यक्ष ओरीयंटल कामगार संघटना धनाजी ढेरंगे, माजी सरपंच दत्तात्रय गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समिति माजी अध्यक्ष सतीश गव्हाणे, पांडुरंग ढेरंगे, बाळासाहेब दाभाडे, पोपट चौधरी, तुकाराम ढेरंगे, कानिफनाथ ढेरंगे, राजेश ढेरंगे, दत्ता ढेरंगे , जगदीश ढेरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.