पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीच्या वेळी एक विचित्र आणि थोडी गंमतीशीर घटना घडली आहे. भात लावण्यासाठी शेतात गेलेला एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर रुतला. त्याला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी दहा ट्रॅक्टर आणले, पण दुर्दैवाने तेही त्याच चिखलात एकामागोमाग एक अडकले.
यामुळे एकूण ११ ट्रॅक्टर चिखलात फसले!चिखलाचा अंदाज न आल्याने शेतकऱ्यांची अडचणया अनपेक्षित घटनेमुळे काही काळासाठी संपूर्ण शेतातील भात लागवडीचे काम ठप्प झाले. स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातील चिखलाच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे ही अडचण निर्माण झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.मात्र, ट्रॅक्टर चिखलात अडकल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला आहे. आता हे सर्व ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.