धक्कादायक! छांगूर बाबाने १५०० हिंदू महिलांचे केले धर्मांतरण, महाराष्ट्र कनेक्शनने खळबळ

Swarajyatimewnews

विधवा, निपुत्रिक, परित्यक्ता, पतीशी वाद असलेल्या, कुटुंबापासून एकट्या राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत महिलांना केले लक्ष्य , उत्तर प्रदेश या महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याने उडाली मोठी खळबळ 

उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन ऊर्फ छांगूर बाबा याच्या धक्कादायक कृत्यांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्याचे धर्मांतराचे रॅकेट आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने राज्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही हादरली आहे. जलालुद्दीनने १५०० हून अधिक हिंदू महिलांचे धर्मांतरण केल्याचे उघड झाले आहे.बलरामपूर येथील त्याच्या आलिशान बंगल्यावर योगी सरकारने बुलडोझर फिरवला आहे. त्याचे दुबई कनेक्शन आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्या एजन्सीज आता एटीएसच्या रडारवर आहेत. दहशतवादी संघटनांशी त्याचे संभाव्य संबंध तपासले जात आहेत.

गुरु-चेलीचा धर्मांतराचा कट – आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जलालुद्दीनने सुमारे १५०० हिंदू महिलांचे धर्मांतरण केले आहे. हजारो महिलांना लक्ष्य करून त्यांच्यामार्फत एक मोठे संघटन उभारण्याचा त्याचा कट होता, ज्यामागे त्याचे भयानक मनसुबे असल्याचे उघड झाले आहे. छांगूरची स्विस बँकेत खाती असल्याचीही माहिती समोर येत आहे.

या रॅकेटमध्ये त्याची पट्टशिष्या नीतू रोहरा, जी आता नसरीन म्हणून ओळखली जाते, हिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नसरीनने हिंदू महिलांवर धर्मांतरासाठी दबाव आणला आणि हजारो हिंदू मुलींचे धर्मांतरण केले. तिला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विधवा, निपुत्रिक, परित्यक्ता, पतीशी वाद असलेल्या महिला टार्गेट –  एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, छांगूरने अंदाजे १५०० हिंदू महिला आणि मुलींचे धर्मांतरण केले. विधवा, निपुत्रिक, परित्यक्ता, पतीशी वाद असलेल्या, कुटुंबापासून एकट्या राहणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत महिलांना तो लक्ष्य करत असे. त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली, चमत्कारांचे आमिष दाखवून, बुवाबाजी आणि उपचारांच्या माध्यमातून तो त्यांना फसवित असे. त्यानंतर त्यांचे ब्रेनवॉश करून धर्मांतरासाठी दबाव आणला जात असे. नसरीन आणि तिच्या टोळीने छांगूरची “पीर”, “रुहानीबाबा” आणि “मसीहा” अशी प्रतिमा तयार केली होती, ज्याचा उपयोग धर्मांतरासाठी केला जात होता.

 धर्मांतराचे कौटुंबिक रॅकेट – जलालुद्दीन एकटाच नव्हे, तर त्याचे नातेवाईकही या अवैध धर्मांतरण रॅकेटमध्ये सामील आहेत. अनेक हिंदू महिलांचे धर्मांतरण केल्यानंतर त्यांच्यामार्फत इतर हिंदू मुलींचे धर्मांतरण करण्याची मोहीम जलालुद्दीन आणि त्याच्या नातेवाईकांनी सुरू केली होती. काही ठिकाणी त्यांनी सार्वजनिक धर्मांतरण कार्यक्रमही आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. आझमगढ भागात असे कार्यक्रम घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांविरोधात सक्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!