कोरेगाव भिमा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Swarajyatimesnews

६ जून २०२५ – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) ग्रामपंचायतमध्ये रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच श्री. संदीपदादा ढेरंगे, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. आण्णा गव्हाणे, माजी घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक कैलासराव सोनवणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, माजी चेअरमन पंडितराव ढेरंगे, माजी सरपंच श्री. अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य सौ. कोमल खलसे, सौ. जयश्री गव्हाणे, तसेच राजाराम नळकांडे, लहू मेटे, दत्तात्रय शिवले यांच्यासह ग्रामपंचायतचे आरोग्य सफाई कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सेवा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना फेटा बांधून आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच यांनी केले. पी. के. आण्णा गव्हाणे आणि कैलासराव सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर माजी सरपंच अमोल गव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

गावामध्ये कामकाज करणाऱ्या महिलांच्या हस्ते गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!