दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार म्हणजे! पाणीदार केंदूर – अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये

Swarajyatimesnews

दिनांक २ मार्च

केंदूर (ता. शिरूर) येथील जलआत्मनिर्भरतेसाठी सुरू असलेल्या पाणी पुनर्भरणाच्या प्रकल्पात चार वर्षांपूर्वी जलआरेखन करून गावातील जलस्त्रोत, जुने पाझर तलाव व तत्सम माहिती संकलित करणारे जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या टीमने गावाचा जलआराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ३५०० हेक्टर परिसरातील जलस्तर सुधारून गावाला स्वावलंबी बनवण्याची दिशा आखली गेली.अनाई यातून महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार घडला आणि दुष्काळी गाव म्हणून ओळख असणारे  केंदुर गाव पाणीदार गाव म्हणून नावलौकिक प्राप्त झाला आणि याची दखल अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये यांनी घेतली यातच या उपक्रमाचे यश दिसते.

              यशदाचे संचालक तथा जलतज्ञ डॉ.सुमंत पांडे यांच्या टिमने चार वर्षांपूर्वी गावाचे जलआरेखन करुन जलस्त्रोत, जलपुनर्भरणाची ठिकाणे, जुने पाझर तलाव व तत्सम माहितीचे संकलन करुन जलआराखडा गावचा तयार केला आणि त्यानुसार ३५०० हेक्टरच्या गावहद्दीत जलस्तर वाढवून त्यातूनच गावजलआत्मनिर्भर करण्याची दिशा दाखवून दिली. यासाठी मुळ केंदूरचे असलेले कोल्हापूर आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांनीही मदत केली. या शिवाय नवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त दिपक साकोरे, म्हाडाचे सीईओ राहूल साकोरेंसह गावातील उच्चपदस्थ सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी या कामी लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रत्येक ठिकाणी मदती केल्या. पर्यायाने सकाळ रिलीफ फंड व अनेक कंपन्यांनी आपल्यापाणीदार केंदूर – दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार: अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये सीएसआर निधीतून गावातील सर्व डोंगर उतारांवर जलंधारणाची कामे केली. 

             गेली चार वर्षांपासून जलआत्मनिर्भरतेसाठी झटत असलेल्या आणि भौगोलिक उंचवट्यावर असलेल्या केंदूर (ता.शिरूर) येथील पाणीदार केंदूरचे जलपुनर्भरणासाठी चाललेले काम पहायला थेट अमेरिकेतून आलेले वॉटर फॉर पीपल संस्थेचे सीईओ मार्क डूये अक्षरश: भारावले. कारण शासनाच्या मदतीसाठी, राजकारण्यांच्या आश्वासनांवर, निसर्गाच्या बेभरोसे पर्जन्यमानावर आणि कुठल्याही चमत्कारावर विश्वास न ठेवता गावक-यांनी पाणीदार केंदूर करण्यासाठी जे काम सुरू ठेवले आहे ते अद्वितीय व महाराष्ट्रातील चमत्कार असल्याचे उद्गार त्यांनी काढले. यातीलच एक असलेल्या वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट या संस्थेकडून जुन्या कामांच्या पूर्ततेनंतर जलसंधारणाच्या नवीन कामांची सुरवात नुकतीच केली. याच निमित्ताने कंपनीचे अमेरिकास्थित सीईओ मार्क डूये यांनी गावाला भेट दिली आणि सर्व कामांची पाहणी करुन अद्वितीय व महाराष्ट्रातील चमत्कार असे म्हणत कौतुक केले. त्यांचा व त्यांचे समवेत आलेले कंपनीचे भारतातील संचालक बिश्वदीप घोष (दिल्ली), महाराष्ट्र प्रतिनिधी हेमंत पिंजण, सुगंधा चंद्रा, तृप्ती अष्टांकर, प्रकल्पप्रमुख तिलकचंद कटरे आदींचे सत्कार सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच शालन भोसुरे, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, अमोल थिटे, भरत साकोरे, भाऊसाहेब थिटे, बन्सीशेठ प-हाड, माऊली थिटे, सुभाष प-हाड, अशोक पऱ्हाड आदींचे हस्ते करण्यात आले. यावेळी बाजीराव भोसुरे, सतीश भोसुरे, राजेंद्र थिटे, विश्वास प-हाड, मदन प-हाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

            गावातील भूजल पातळी सुधारण्यासाठी भोसुरस्थळ, थिटेमळा, पऱ्हाडमळा, जांभळा, थिटेवाडी शिवारात मृदा व जलसंधारणाची कामे माथा ते पायथा या पध्दतीने सुरू आहेत. यात डीप सीसीटी, एलबीएस-संकन पाँड्, माती नालाबांधचे खोलीकरण, नवीन माती नाला बंधारे, कंपोझिट ग्याबियन बंधारे, सिमेंट बंधारे बांधण्याची कामेही जोरात सुरू आहेत. केवळ पाणी उपलब्धतेपूरते पाणीदार केंदूर कार्यक्रमात सुरू नाही तर शेतकऱ्यांसाठी हवामान अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब, उपलब्ध पाण्याचा पर्याप्त  वापर करण्यासाठी मिनी स्प्रिंकलर सेट, सोलर ट्रॅप, स्लरी टँक, गांडूळ बेड तसेच आधुनिक शेती विकसित करण्याच्या अभ्यास सहली, पाणी व्यवस्थापन समिती प्रशिक्षण आदी कामे वॉटर फॉर पिपल संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत. हा अभिनव पॅटर्न जलस्वयंपूर्ण गावासह आदर्श शेतीचा केंदूर पॅटर्नसाठीही पोषक होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!