वाघोलीत टँकरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

Swarajyatimesnews

वाघोली (ता.हवेली) कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. याप्रकरणी  शरद भाकरे यांनी चालक आणि मालकाविरुद्ध पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे

राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत होत्या. यावेळी पुण्याहून नगरकडे जात असलेल्या पाण्याच्या टँकर क्रमांक एम एच १२ व्ही डब्लू २७९७ ने मागून धडक दिली आणि त्या गाडीखाली चिरडल्या.टँकरची धडक इतकी जोरदार होती की राधिका गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने आयमॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राधिका यांच्या दोन्ही पायांना आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती आणि संपूर्ण शरीरावर अनेक ओरखडे होते. त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. टँकर चालक २० वर्षीय अजय धोत्रे याला वाघोली पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान, त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा अभाव आणि टँकरचा विमा नसल्याचे उघड झाले आहे.वाहन चालक अजय धोत्रे व वाहन परवाना नसताना तसेच वाहनाचा विमा नूतनीकरण नसताना वाहन चालविण्यास प्रोत्साहन दिल्याने  वाहन मालक गणेश तांबे यांच्या विरोधात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!