कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन रिक्षाचालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी एका रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय १९, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे) यांचा समावेश आहे.
याबाबत अनल राजेंद्र मुंगसे (वय ३० वर्षे ) रा. आनाजीचा मळा वढू बुद्रुक यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली दिली.सदर प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एम एच १२ क्यू आर ५२४२ या रिक्षावरील चालक राजेंद्र मुंगसे हे त्यांच्या रिक्षातून चाललेले असताना पाठीमागून आलेल्या एका रिक्षा चालकाशी शाब्दिक वाद झाल्याने पाठीमागून आलेल्या रिक्षा चालकासह त्यामध्ये असलेल्या दोघा युवकांनी राजेंद्र यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने तोंडावर व डोक्याला बेदम मारहाण करत राजेंद्र यांचा खून केला, त्यांनतर पाठीमागून आलेल्या रिक्षातील तिघेजण पळून गेले.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी स्वतः सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला असता. तपासादरम्यान एम एच १४ एल एस ०९१५ या रिक्षातील तिघांनी खून केल्याचे समोर आले, त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, संतोष मारकड, शिवाजी चीतारे, कृष्णा व्यवहारे, महेंद्र पाटील, जयराज देवकर यांनी पुण्यातील कुदळवाडी परिसरात जात रिक्षा सह तिघांना ताब्यात घेतले, त्यांनी रिक्षाच्या वादातून झालेल्या शाब्दिक वादातून सदर रिक्षा चालकाचा खून केल्याचे सांगितले, सदर गुन्ह्यात पोलिसांनी सोमेश अशोक सरोदे वय २७ वर्षे रा. मोरे वस्ती चिखली पिंपरी चिंचवड पुणे मूळ रा. रेल्वे स्टेशन जवळ सांगली, दिपक राजू साठे वय १९ रा. नेहरूनगर पिंपरी पुणे, ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे वय १९ वर्षे रा. मोरे वस्ती चिखली पिंपरी चिंचवड पुणे मूळ रा. सौंधे ता. करमाळा जि. सोलापूर यांच्या अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस हवालदार प्रताप कांबळे हे करत आहे.