फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे (२५) आणि सचिन रणपिसे (२६) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. (In the case of the kidnapping and murder of a girl in Phulgaon (Tal. Haveli) two months ago, villagers have blocked the road and demanded the death penalty for the accused along with increasing the sections of the crime. Two months ago, a girl went missing from Phulgaon. Her father had filed a complaint at Lonikand police station. During the investigation, it was revealed that she was murdered. The accused in this case, Balaji Hinge (25) and Sachin Ranpise (26), have been arrested.)
यावेळी ग्रामस्थांनी आळंदी रस्ता अडवून रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला, आंदोलनाच्या ठिकाणी लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार साहेब दाखल झाले त्यावेळी ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले, त्यावेळी आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता मोकळा केला.
ग्रामस्थांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आळंदी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. पोलीस निरीक्षकांनी आरोपींना न्यायालयीन कारवाईत कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विविध पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित.सदर प्रकरणाचा लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.