Swarajyatimesnews

धक्कादायक! पेरणे फाटा येथे भीषण आग, गॅसच्या टाक्यांच्या स्फोटाने हादरला परिसर

कोरेगाव भिमा – दि. २१ एप्रिल पेरणे फाटा (ता. हवेली) रात्री दोन च्या सुमारास अचानक आग लागली व आगीने रौद्र रूप धारण केल्याने तसेच शेजारी असणाऱ्या गॅसच्या टाक्यांनी पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाघोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले….

Read More
Swarajyatimesnews

चासकमान कालव्यातून शिक्रापूर परिसरात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण, शेती, जनावरे व पशुपक्षी यांची तहान भागवणे व पिकांना जागवण्यासाठी शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने चासकमान कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून रणरणत्या उन्हाता शेतकरी, नागरिक, जनावरे व पशुपक्षी यांच्यासाठी तरी आता पाणी सोडण्यात येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असून चासकमान बंधारे विभाग टाटाकीम पाणी…

Read More
Swarajyatimesnews

पुण्याच्या खेड तालुक्यातील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीच्या घराला व ट्रॅक्टरला आज्ञातांकडून पेटवून देण्याचा प्रयत्न..

मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याची उत्साहात सुरुवात

शिक्रापूर (ता. शिरूर) : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या अभियानाचा शुभारंभ शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार, अजय वाघमोडे, राजेश…

Read More
Swarajyatimesnews

महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे ५२ वे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश पदी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.१४ मेला राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे जन्म झाला. १९८५ मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश गव्हाणे यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश पोपट गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. यावेळी माजी सरपंच विक्रम गव्हाणे, उपसरपंच सविता घावटे शाळा व्यवस्थपन समितीचे  माजी अध्यक्ष सुमिता विनायक गव्हाणे, जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष अविनाश  गव्हाणे, उपाध्यक्ष भाजपा संपत गव्हाणे,किसन मोर्चा उपाध्यक्ष सुनील सव्वाशे,पुणे…

Read More
Swarajyatimesnews

कौतुकास्पद! मंथन  परीक्षेत पिंपळे जगतापची प्रियल अशोक नाईकनवरे राज्यात सातवी तर पुणे जिल्ह्यात दुसरी 

एकाच वेळी तीन परीक्षांमध्ये मिळवले नेत्रदीपक यश पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील विद्यार्थिनीने नेत्रदीपक यश मिळवत राज्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अभिरूप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामीनेशन(एन एस एस ई)) या परीक्षेत राज्यात ११ वी तर मंथन परीक्षेत राज्यात सातवी व जिल्ह्यात दुसरी क्रमांक मिळवून पिंपळे जगताप गावचे नाव राज्य स्तरावर झळकावले असून…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंती पर्यंत शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन 

श्रीराम जयंती निमित्त यज्ञाला बसल्या १५१ जोड्या कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील अखिल कोरेगाव भीमा समस्त नागरिकांच्या व युवकांच्या समन्वयातून शिरूर तालुक्यातील व पुणे जिह्यातील ग्रामीण भागात नावाजलेली व भक्तिभाव पूर्ण शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या यज्ञाला १५१ जोड्यांच्या हस्ते संपन्न झाला. या…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी वंदना भुजबळ यांची निवड

शिक्रापूर (ता.शिरूर) गावाच्या उपसरपंच पदी माजी सरपंच आबासाहेब करंजे व बापूसाहेब जकाते यांच्या पॅनलच्या वंदना रमेश भुजबळ यांची निवड झाली. पूजा दिपक भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची  निवडणूक पार पडली. या निवडणुकीत वंदना रमेश भुजबळ व शालन अनिल राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला.  १७ सदस्य असणाऱ्या शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये मतदान पार पडले.यावेळी झालेल्या…

Read More
Swarajyatimesnews

पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा (डीपीआर) अखेर रद्द करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या या आराखड्यावर मोठ्या प्रमाणात हरकती आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या आराखड्याची प्रक्रिया पुन्हा राबवण्याचे आदेश पीएमआरडीएला देण्यात आले आहेत. २०१५ पासून सुरू असलेली प्रक्रिया…

Read More
error: Content is protected !!