वाघोलीत वक्तृत्वाचा जागर; ‘बीजेएस’ राज्यस्तरीय स्पर्धेत सिद्धी बाफना प्रथम
वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १८ वी स्व. पी. सी. नाहर स्मरणार्थ ‘मुक्तचिंतन’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. नागपूरपासून नेवाशापर्यंतच्या २२ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. नेवाशाच्या सिद्धी बाफना (जिजामाता कॉलेज) प्रथम क्रमांक, वसुधा पाटील (देसाई कॉलेज, पुणे) हिने द्वितीय तर नागपूरच्या अनिकेत वनारे (संताजी कॉलेज) याने तृतीय क्रमांक…
