पुण्यात तिहेरी हत्याकांड, गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू, प्रेयसीच्या मृतदेहा सोबत दोन मुलांना नदीत फेकले

स्वराज्य टाइम्स

इंद्रायणी नदीत तिघांचा शोध सुरू

पुणे – अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकताना महिलेच्या दोन लहान मुलांनी टाहो फोडल्याने दोन्ही मुलांनाही इंद्रायणी नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

ही धक्कादायक घटना ६ ते ९ जुलै २०२४  दरम्यान घडली आहे. याप्रकरणी आरोपीला आंबी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याशिवाय आरोपीच्या एका साथीदाराच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.या तिघांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह मावळ तालुक्यातील वराळे येथे आणण्यात आला. दरम्यान तिची दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागल्याने आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राने दोन्ही मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिले. तसेच महिलेचा मृतदेह देखील इंद्रायणी नदीत फेकला.महिलेचा प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघांचा मृतदेह शोधण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोनावळा या संस्थांना पाचारण केले.

परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यातच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे शोध कार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!