डिंग्रजवाडी येथे विद्यार्थ्यांचे फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

Swarajyatimesnews

डिंग्रजवाडी (ता. शिरूर):जि. प. प्राथमिक शाळा डिंग्रजवाडी येथे शैक्षणिक वर्ष 2025–26 चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या पहिलीतील विद्यार्थ्यांसह इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांचे गावातून मिरवणूक काढत, ढोल-ताशांच्या गजरात, फेटे बांधून आणि सजवलेल्या ट्रॉलीतून स्वागत करण्यात आले.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, पालकांच्या डोळ्यांतील अभिमान आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमासाठी सरपंच यशवंत गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  विकास गव्हाणे, शैक्षणिक मार्गदर्शक विशाल गव्हाणे, उपाध्यक्ष पायल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी जासूद साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गावातील उद्योजक, पालक, ग्रामस्थ आणि शाळा समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!