मद्यधुंद डंपर चालकाने वाघोली फुटपाथवरील ९ जणांना चिरडलं: तिघांचा मृत्यू, सहा जखमी

Searajyatimesnews

वाघोली (ता.हवेली) पुण्यातील वाघोली परिसरातील केसनंद फाट्यावर एका भरधाव  डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.(Wagholi (Haveli) A speeding dumper crushed nine people sleeping on the pavement at Kesanand Phata in Wagholi area of Pune. Three people died on the spot. The deceased in this accident include two children and their uncle. Six people have been seriously injured in this incident. The condition of three of these injured is critical.)

वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. रात्री १२ ते १ च्या सुमारास वाघोलीतील केसनंद चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. सदर डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्वजण कामगार असून ते अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. या अपघातावेळी फुटपाथवर १२ जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते.

वाघोली परिसरात केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री १ ते १.३०  च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाने झोपेत असलेल्या ९ जणांना चिरडलं. फूटपाथवर झोपलेले, जखमी असलेलेल हे सर्व अमरावतीचे रहिवासी असल्याचं समजतं. काम शोधण्यासाठी ते पुण्यात आले होते आणि वाघोली परिसरातील एका फूटपाथवर ते झोपले होते. मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यापैकी तिघांचा तर जागीच मृत्यू झाला, त्यांना रुग्णालयातही नेण्यात आलं नाही. तर ६ जखमींपैकी तिघांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्यावर ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तर तिनही मृत व्यक्तींचे मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी ससूनमध्ये आणण्यात आले आहेत.

डंपरच्या आवाजाने झोपेतून उठलो, पण… चिमुकल्यांच्या वडिलांनी काय सांगितलं ? वाघोली परिसरात मद्यधुंद डंपरचालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ज्या ९ जणांना चिरडलं , त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा नेमकं काय घडलं याचा आखोंदेखा हाल त्या मुलांच्या वडिलांनी साश्रूनयनांनी सांगितला. ” रात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात घडला. आम्ही सगळे गाढ झोपेत होतो, अचानक डंपरचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खाडकन उठलो, समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेचना. आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंतच सगळा खेळ खल्लास झाला होता, तिघजणं तर जागीच ठार झाले होते, रुग्णालयापर्यंतही पोहोचता आलं नाही. इतर जखमींना कसंबस रुग्णालयात नेलं, पण माझ्या मुलांचा जीव काही वाचू शकल नाही. ते एवढे जखमी झाले की रुग्णालयात पोहोचेपर्यंतच त्यांचा श्वास थांबला होता ” असे सांगताना त्या पित्याचे हृदय पिळवटून निघालं.

जखमी आणि मृतांची नावं समोर

रविवारी रात्री झालेल्या या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. विशाल विनोद पवार (वय २२ वर्ष), वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय २ वर्ष) अशी तिघांची नावं आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय २१), रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८) आलिशा विनोद पवार (वय ४७) अशी सहा जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे याने मद्यपान केल्याचे तपासात समोर आले असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील सर्वजण कामाच्या शोधात अमरावतीहून पुण्यात कालच आले होते.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल – या घटनेनंतर आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (26) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!