लेखन वास्तवावर आधारित असेल तर ते वाचकांना रुचकर वाटते – विश्वास पाटील
वाघोली (ता.हवेली) कथा, कादंबरी लिहिताना भाषा शैली महत्त्वाची असून कथा कादंबरीतील लेखन हे वास्तवावर आधारित असेल तर ते अधिक वाचकांना अधिक रुचकर वाटते,त्याच्या काळजाला भिडते त्यातून भावनिक व वैचारिक मंथन होऊन वस्तवतेशी नाळ जोडली जाते.पानिपत, झाडाझुडती, पांगिरा, चंद्रमुखी, संभाजी, महानायक अशा अनेक कादंबऱ्या लिहिताना समाजातील वेगवेगळ्या लोकांचा आलेला संबंध हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण ठरला असल्याचे प्रतिपादन साहित्यिक व पानिपतकार विश्वास पाटील यांनी बीजेएस महाविद्यालयाचा २९ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
वाघोली येथे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था यांच्या पुढाकारातून ५ सप्टेंबर १९९५ रोजी स्थापन झालेल्या भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा २९ वा वर्धापन दिन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.

विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास होण्यासाठी गाजलेल्या कादंबऱ्या वाचून त्यातील वास्तवतेचा शोध घेऊन पुढे बोध घेतला पाहिजे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जैन संघटना प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड यांनी मत व्यक्त केले. बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी बीजेएस प्रकल्प स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या घटनांची माहिती दिली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी महाविद्यालयातील स्थापनेपासून ते या वर्धापनदिनापर्यंत आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती देताना महाविद्यालयाच्या यशस्वी वायचालियनाबत माहिती देत भविष्यात नेत्रदीपक कामगिरी करणार असल्याचे सांगितले.
महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करत विद्यार्थांनी शिकविण्याचा आनंद घेतला तर विद्यार्थी प्राचार्य कु. निकिता कुंजीर यांनी प्रशासन चालविण्याचा अनुभव घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रथम गोळे आणि प्रणाली मोझे यांनी विश्वास पाटील यांचे रेखाचित्र बनवून त्यांना भेट दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भूषण फडतरे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारती जाधव यांनी तर प्रा. चक्रधर शेळके यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी गौतम बाटीया, संदीप लुणावत, प्रभाकर ओव्हळ, सोपानराव खुडे, प्राचार्य प्रा. संतोष भंडारी, डॉ. एस. व्ही. गायकवाड, डॉ.बळवंत लांडगे, डॉ. मनीषा बोरा, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. रमेश गायकवाड, श्याम पाटील तसेच मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.भूषण फडतरे, डॉ.सहदेव चव्हाण, डॉ.चक्रधर शेळके, प्रा.स्वाती कोलट, डॉ.भारती जाधव, डॉ.सचिन कांबळे, डॉ.विकास बाहुले, प्रा.सुवर्णा पाटील, प्रा.रोहिणी शेवाळे, श्री.गिरीश शहा, निकिता कुंजीर, शुभम आव्हाळे यांनी केले.