वाघोलीचा शंतनु वर्मा ठरला “बेस्ट राइजिंग स्टार ऑफ इंडिया” 

स्वराज्य टाइम्स न्यूज

बॉलिवूड अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते सन्मानित

मुंबई – वाघोली येथील शंतनू वर्माने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कलेची छाप उमटवली आहे. २ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित “इंट्रनॅशनल ग्लॅम आयकॉन २०२४” या भव्य कार्यक्रमात शंतनू वर्मा याला बॉलिवूड अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते “बेस्ट राइजिंग स्टार ऑफ इंडिया” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात शंतनूला मिलिंद गुणाजी यांच्या सोबत रॅम्प वॉक करण्याची तसेच सोलो डान्स परफॉर्मन्स सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली. शंतनू वर्माने या अगोदर वीकेंड, गर्व से कहो हम हिंदू है अशा शॉर्ट फिल्म्समध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याने ताली या चित्रपटात सुष्मिता सेनसोबत रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली छोटासा पण महत्त्वपूर्ण रोल साकारला आहे.

शंतनु सध्या ‘दिल क्या कहे’ या आगामी चित्रपटात बालकांवरील लैंगिक शोषण या संवेदनशील विषयावर महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय त्याने अनेक प्रतिष्ठित फॅशन शोजमध्ये ‘टॉप ज्युनियर मॉडल’ हे किताब पटकावले आहे. त्याची निवड आता “निब करोली बाबा” यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी झाली असून लवकरच त्याचे शूट सुरू होणार आहे.

आपल्या शाळेच्या अभ्यास आणि शूटिंग शेड्यूलचा उत्तम समन्वय साधून तो दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत असून  क्रिकेट, डान्स, मॉडेलिंग, आणि कुकिंग यांचीही विशेष आवड आहे. त्याच्या या यशामध्ये त्याचे पालक मीना गागरे आणि संजय वर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते सतत प्रयत्न करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!