वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी बीजेएस महाविद्यालयाचा हेरिटेज वॉक संपन्न

Swarajyatimesnews

श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) हे ठिकाण मराठ्यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे व बलिदानाचे तेरावे ज्योतिर्लिंग व राष्ट्र तेजाचे धगधगते अग्निकुंड असून या भूमीत छत्रपती शंभूराजांचे रक्त आणि प्राण मिसळलेले असल्याने या भूमीचे श्रेष्ठ स्थान असून ते प्रेरणादायी आहे. मराठ्यांच्या इतिहासाची रक्तरंजित, चित्तथरारक असे जाज्वल्य पराक्रमाची साक्षीदार असलेली वीरभूमी म्हणजे वढू बुद्रुक असल्याचे प्रतिपादन संभाजी शिवले गुरुजी यांनी बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉक प्रसंगी मत व्यक्त केले.

पुढे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजाच्या जन्मापासून ते हत्येपर्यंतचा इतिहास व मृत्युसमयी झालेल्या हालअपेष्टा ऐकताना विद्यार्थी भरलेल्या डोळ्यांनी अक्षरशः भारावले होते.
प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी अहिल्याबाई होळकरांचे कार्य आणि कर्तृत्व या विषयावर मौलिक माहिती दिली.


येथील हेरिटेज वॉकमध्ये छत्रपती संभाजी महाराज समाधी, कवी कलिश समाधी, शिवमंदिर इत्यादी वास्तूंचा इतिहास समजावून घेतला. हेरिटेज वॉक प्रसंगी छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांच्या समाधीवर नतमस्तक होत प्रतिमेचे पूजन सरपंच ज्ञानेश्वर भंडारे, माजी सरपंच अंकुश शिवले, माजी सरपंच अनिल शिवले, माजी उपसरपंच हिरालाल तांबे, रमाकांत शिवले, संतोष शिवले, ग्रामसेवक शंकर भाकरे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, माजी विद्यार्थी किरण शिवले, संतोष शिवले व इतर मान्यवर यांच्यासह १०० विद्यार्थी उपस्थित होते.
प्रयाग राज येथील कुंभमेळ्यातील आणलेल्या पवित्र कलशातील जल शंकराच्या मंदिरात रुद्र पठण करत तेथील पिंडीवर अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भूषण फडतरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन कांबळे यांनी तर आभार चेअरमन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. भूषण फडतरे, डॉ. सचिन कांबळे, प्रा. बंडू ब्राम्हणे, शुभम आव्हाळे माजी विद्यार्थी किरण शिवले. सरपंच ज्ञानेश्वर भंडारे, संतोष शिवले व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!