वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी

स्वराज्य टाईम्स न्यूज

चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला होता. यावेळी साऊंड सिस्टीमवर उभा राहून दोन तरुण झेंडा फिरवत होते. दरम्यान, झेंडा फिरवताना त्या ठिकाणाही असलेल्या उच्चदाब विजेच्या तारांना झेंडा लागला आणि त्याचा झटका या दोघा तरुणांना बसला. विजेचा जोरदार शॉक लागटाच काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. यापैकी एका तरुणाच्या जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील जखमी तरुणाला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा देखील उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला, अभय वाघमारे (वय १७)अशी या घटनेत मृत झालेल्या दोन्ही तरुणांचे नाव असून अंखिंजन जन जखमी झाल्याची प्राथमिक मिळत आहे.सदर प्रकरणाचा पुढील.तपा चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!