बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण खेळाडूंना संधी – आमदार बापूसाहेब पठारे

Swarajyatimesnews

आण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेला उदंड प्रतिसाद

वाडेबोल्हाई (ता.हवेली) एक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा गेले ३ वर्ष झाले सातत्याने आमचे मोठे बंधू क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेते आण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडेबोल्हाईत आयोजित होत आहे.या मोठ्या बोल्हाई माता प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी प्राप्त होत असल्याचे बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले.

             पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्काराचे विजेते पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब तुकाराम पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथे बोल्हाई माता प्रीमियर लीग अर्थात बी.पी.एल पर्व तिसरे या टेनिस बॉल क्रिकेट महासंग्राम स्पर्धेचे भव्य आयोजन बोल्हाई माता स्टार फायटर क्रिकेट संघ व समस्त ग्रामस्थ वाडेबोल्हाई यांच्या वतीने २३ ते २९ डिसेंबर या आठवडाभर कालावधीमध्ये करण्यात आले होते.

                      या स्पर्धेत एकूण २५ गाववाईज संघ सहभागी झाले होते.यामध्ये हवेली तालुक्यातील शिंदवणे क्रिकेट क्लबने प्रथम क्रमांक विजेते पद पटकविले तर आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी संघ दुतिय उपविजेता राहिला.या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आमदार बापूसाहेब पठारे,कुस्तीगीर संघाचे प्रदेशाध्यक्ष पै.संदिप भोंडवे,कृ.ऊ.बाजार समितीचे उपसभापती रविंद्र कंद,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक तथा युवा नेते प्रदिप शिंदे,सरपंच वैशाली केसवड,बोल्हाई माता प्रासादिक दिंडीचे संचालक विजय पायगुडे,संचालक सोपान गावडे,संत तुकाराम सोसायटीचे चेअरमन निळकंठ केसवड,वाडेबोल्हाईचे युवा नेते वैभव पठारे,माजी उपसरपंच योगेश गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस(एस.पी) तालुका उपाध्यक्ष संध्या भोर,केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे,लोणीकंदचे माजी उपसरपंच बापूसाहेब शिंदे,दशरथ वाळके,उमेश साळुंके,प्रकाश इंगळे,आदी अनेक मान्यवर,पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                        ही स्पर्धा काटेकोरपणे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्पर्धेचे  आयोजक व नियोजक पत्रकार विजयराव लोखंडे,पै.मारुती ठवरे,गणेश चौधरी,विशाल केसवड,जगन्नाथ ढवळे,अक्षय गायकवाड,महेश लांडगे,मंगेश जाधव यांच्यासह बोल्हाई माता स्टार फायटर्स क्रिकेट संघ मित्र परिवार यांनी परिश तर अंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे काटेकोर नियम व शिस्त बधता या स्पर्धेत पहायला मिळाली आहे.या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून शेवट पर्यंत अनेक मान्यवरांनी भेट देऊन या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात असून या स्पर्धेला परिसरातील प्रेक्षकांचा,ग्रामस्थांचा,खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला.

  • स्पर्धेतील पाच क्रमांक पटकविलेले संघ व वयक्तिक बक्षिसे मिळवणारे सर्वोत्कृष्ट खेळाडू:-
  • १)प्रथम क्रमांक/विजेता:-शिंदवणे क्रिकेट क्लब,शिंदवणे(हवेली )
  • २)दृतिय क्रमांक/उपविजेता:-लोणी धामणी(आंबेगाव)
  • ३)तृतीय क्रमांक:-पत्रकार विजयराव लोखंडे स्टार फायटर्स,मांडवगण फराटा.(शिरूर ).
  • ४)चतुर्थ क्रमांक संघ:-तुकाई टायगर्स,पारगाव शालू मालू(दौंड ).
  • ५)पाचवा क्रमांक संघ:-एच.के.स्पोर्ट क्लब,लोणीकंद.(हवेली)
  • मॅन ऑफ द सीरिज/मालिकावीर:विशाल धारक(शिंदवणे क्रिकेट क्लब,शिंदवणे)बेस्ट बॅटसमन/सर्वोत्कृष्ट फलंदाज:- विशाल मोरे,महाराष्ट्र पोलीस(तुकाई टायगर्स,पारगाव).
  • बेस्ट बॉलर/सर्वोत्कृष्ट गोलंदाज:-अभी कुजुर(एच.के.स्पोर्ट,लोणीकंद).बेस्ट फिल्डर/सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक:-मंगेश जाधव(पत्रकार विजयराव लोखंडे स्टार फायटर्स,वाडेबोल्हाई).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!